रस्ते अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अनेकांचा या अपघातांमध्ये बळी जाण्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात आज हृदयद्रावक घटना घडली आहे.
चाकी ट्रकच्या खाली आल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. बापाचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन चिमुकलीने रूग्णालयात जाताना प्राण सोडले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरालय. आज दुपारी १२ वाजता हा बारामतीमध्ये हा भयंकर अपघात झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , एका हायवा ट्रकने (क्रमांक MH 16-CA-0212) दुचाकीला (क्रमांक MH 42-B-4844) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन मुली, सई (वय 11) आणि मधुरा (वय 5) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने बारामतीत शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ओंकार आचार्य हे आपल्या दोन्ही मुलींसह दुचाकीवरून खंडोबानगर चौकातून जात होते. त्याचवेळी वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या धडकेत तिघेही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले. ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला, तर सई आणि मधुरा यांना तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी हायवा चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.