दुर्दैवी घटना : विठुरायाच्या दर्शनासाठी आल्या , पण काळाने हिरावलं..! चंद्रभागा नदीत स्नान करताना २ महिलांचा बुडून मृत्यू  , एक बेपत्ता
दुर्दैवी घटना : विठुरायाच्या दर्शनासाठी आल्या , पण काळाने हिरावलं..! चंद्रभागा नदीत स्नान करताना २ महिलांचा बुडून मृत्यू , एक बेपत्ता
img
Dipali Ghadwaje
चंद्रभागा नदी पात्रात स्नान करत असताना मोठा अनर्थ घडला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आषढी वारीनंतर पंढरपुरमध्ये विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या ३ महिला भाविक नदीत बुडाल्याची घटना पंढरपुरमध्ये घडली आहे. भक्त पुंडलिक मंदिराजवळ आज सकाळी ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिला भाविकांचे मृतदेह सापडले तर तिसरी महिला भाविक वाहून गेली. बेपत्ता झालेल्या या महिलेचा शोध घेतला जात आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ३ महिला भाविक बुडाल्या.

संगीता सपकाळ आणि सुनिता सपकाळ या दोन महिलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. तर आणखी एका महिलेचा शोध सुरू आहे. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी या महिला गेल्या होत्या. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन महिला भाविकांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. तर तिसऱ्या महिलेचा शोध सुरू आहे. या तिन्ही महिला जालन्यातील असून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरमध्ये आल्या होत्या.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group