कबुतरखान्याचा वाद पेटणार ? कबुतरखाना बंदी प्रकरणावर हायकोर्टाची भूमिका कायम
कबुतरखान्याचा वाद पेटणार ? कबुतरखाना बंदी प्रकरणावर हायकोर्टाची भूमिका कायम
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर -  गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कबुतरखान्याचा वाद चांगलाच पेटला आहे. एका बाजूला हायकोर्टाने निर्देश तर दुसऱ्या बाजूला जैन समुदायाकडून त्या निर्णयाला होणार विरोध यामुळे वातावरण चांगलंच गरम झालं आहे. 

आज मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा मुंबईतील कबुतरखाना बंदी प्रकरणातील याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत राज्य सरकारचे महाअधिवक्ता, मुंबई महापालिका आणि याचिकाकर्ते यांनी आपापली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. कंट्रोल फीडिंगला परवानगी देण्यापूर्वी सार्वजनिक आरोग्याचा विचार करणे, नागरिकांच्या हरकती मागवणे आणि या संदर्भात महापालिकेला थेट निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

सध्या कबुतरखान्यावरची बंदी कायम ठेवण्याचा निर्णयही देण्यात आला. मागील सुनावणीत, बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश कायम ठेवत, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तज्ज्ञांचे मत घेण्याचा सल्ला न्यायालयाने दिला होता. तसेच, सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देऊन आणि नागरिकांचे घटनात्मक हक्क लक्षात घेऊन समिती स्थापन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group