मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून आज तातडीची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत उच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
उच्च न्यायालयाने कोणते निर्देश दिले?
आम्हाला काही फोटो आणि व्हिडिओ दाखवण्यात आले ज्याने स्पष्ट होतंय की मुंबईचे रस्ते अडवण्यात आले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मरीन ड्राईव्ह सगळं आंदोलनकर्त्यांनी भरलं आहे. मुंबईतले रस्ते आंदोलनकर्त्यांनी तुडुंब भरले आहेत.
.
रस्त्यावर नाच सुरू आहे ते रस्त्यावर अंघोळ करत आहेत खेळ खेळत आहेत. आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना देखील परिस्थिती गंभीर असल्याचं मान्य असून शहर थांबलं आहे, हे देखील त्यांना मान्य आहे.
तुम्ही मुंबई थांबवू शकत नाही रस्ते अडवू शकत नाही मुंबईची दिनचर्या थांबवू शकत नाही आणि हेच सगळ सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांच पालन होईल या दृष्टीने राज्य सरकारने पावलं उचलावीत. सगळं पूर्ववत आंदोलनकर्त्यांना दोन दिवसांचा अवधी देऊ. उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार
उद्या (2 सप्टेंबर) आदेशाच पालन झालं की नाही ते राज्य सरकारला कोर्टात सांगाव लागणार.सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटेन आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.