राजकीय ; विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंकडून  माघार
राजकीय ; विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंकडून माघार
img
दैनिक भ्रमर
येत्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन  ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींना वेग  आला आहे. दरम्यान मराठा आंदोलक  मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत  माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून विधानसभा निवडणूक लढवण्यावर जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती. त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती दिली होती.

 288 जागांवर निवडूक लढण्याची तयारी जरांगेंनी केली होती. कालपासून ते 13- 14 जागांवर लढणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. मुस्लीम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींकडून यादी न आल्याने आपण लढणार नाही, असं जरांगे म्हणालेत.

दरम्यान , काल दिवसभर मतदारसंघानुसार सगळ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघ सुद्धा ठरले, काही कमी तर काही वाढले असतील. मराठा समाजाने मतदानावर लढायचं आहे. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही. लढायचं जमेल का? यादीच नाही म्हणल्यावर… एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे एकटयाने कसं लढायचं. यावर रात्री आमची चर्चा झाली. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून घेतलेलं बरं राहीन, असं मनोज जरांगे म्हणालेत

आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की, सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. असे मनोज जरांगे म्हणाले 


इतर बातम्या
Join Whatsapp Group