विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडिंना वेग आला असून राष्ट्रवादी शरद पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नंदूरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात फूट पडली आहे. पक्षावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षश्रेष्ठींकडून विश्वासात घेतलं जात नसल्यानं पादाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर येत आह
पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवण्याच्या घाट जयंत पाटील यांनी घातला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी जयंत पाटील पक्षाला संपवण्याचे काम करत आहेत. जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना ताकद देण्याचे काम करत आहे. असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमची भूमिका स्पष्ट करू असंही या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानं निवडणुकीत याचा नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.