आम्ही जे बोलते ते करतो. मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईमध्ये आज महायुतीमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीच्या कामाचे रिपोर्ट कार्ड जारी केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत महत्वाचं विधान केले. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनाही प्रश्न विचारला.
मनोज जरांगेंनी विचार करावा
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आम्ही शब्द दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं. 10 टक्के आरक्षण आम्ही दिलं, ते रद्द करण्यासाठी कोण कोर्टात गेलं? मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं. आता ते मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढत आहेत.पण त्यांनी हा देखील विचार करावा, की आम्ही काय दिलं. आम्ही सारथी दिलं,महामंडळ दिलं, असे एकनाथ शिंदे म्हणाले.