लाडकी बहिण योजनेवरून मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा , म्हणाले....
लाडकी बहिण योजनेवरून मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा , म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. सरकारने सध्या लाडकी बहीण योजना आणली आहे.  ही योजना चांगली आहे.  योजनेचे फॉर्म भरा, पैसेही घ्या..  पैसे आपलेच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय त्यांची नागपूरची प्लॉटिंग किंवा जमिनी विकून आपल्याला पैसे दिले नाहीत, असे मनोज जरांगे म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

लाडकी बहीण योजना  चांगली आहे. योजनेचे फॉर्म भरा, पैसेही घ्या...पैसे आपलेच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय त्यांची नागपूरची प्लॉटिंग किंवा जमिनी विकून आपल्याला पैसे दिले नाहीत  किंवा देत नाहीत. हा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे. जनतेच्या करामधून आणि जीएसटी इन्कम टॅक्स आणि शेतकऱ्यांच्या टॅक्समधून गोळा केलेला पैसा आपलाच आहे. तोच पैसा आपल्याला परत करत आहेत. राज्याच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली मात्र बहिणीच्या लेकरांचं काय? लाडक्या भाषेच्या आरक्षणाचे काय हे देखील सरकार सांगावं? तसेच लाडकी बहीण योजना आणली मात्र लाडक्या बहिणीच्या मेव्हण्याच्या शेतीच्या भावाचं काय? हे देखील सरकार सांगावं असेही जरांगे यावेळी म्हणाले. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group