दिल्लीत असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जेएनयूमध्ये आंदोलन करण्यात आलं. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं आहे.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गो बॅक अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. देवेंद्र फडणवीस हे विविध कार्यक्रमांनिमित्त दिल्लीत गेले आहेत.
जेएनयूमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार होते. त्याच ठिकाणी फडणवीस यांच्याविरोधात एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. फडणवीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. फडणवीस, एकनाथ शिंदे गो बॅक अशा घोषणा देण्यात आल्या.
जेएनयुमध्ये मराठी अध्ययन केंद्राचे उद्धाटन करण्यात येत आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. राज्यात आणण्यात आलेल्या जन सुरक्षा कायद्यावरून एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात आंदोलन केले.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , महाराष्ट्रात दलित आणि मुस्लिमांवर हल्ले होत आहेत.त्यात तेथील सरकारने जन सुरक्षा बिल आणल्यानं जातीयवादाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे, त्याचा आम्ही विरोध करत असल्याची प्रतिक्रिया एका विद्यार्थीने दिलीय.