सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्वाळा केलाय. विधवा आणि मुलबाळ नसलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर सासरच्यांचा हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाकडून संगणयत आले आहे. सुप्रीम कोर्टाला दोन प्रकरणांची माहिती देण्यात आली. हिंदू समाजात कन्यादानाची परंपरा आहे, ज्या अंतर्गत लग्न झाल्यावर महिलेचे गोत्र (कुळ किंवा वंश) बदलते. परिणामी, विधवा किंवा मुलबाळ हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर, तिची मालमत्ता तिच्या पालकांना नाही तर तिच्या पतीच्या कुटुंबाकडे जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालय हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 च्या कलम 15(1)(ब) ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करत होते. या कायद्यानुसार, जर विधवा किंवा संतानहीन हिंदू महिलेचा मृत्यु मृत्युपत्राशिवाय झाला तर तिची मालमत्ता तिच्या सासरच्यांना जाते.
सर्वोच्च न्यायालयाच्या एकमेव महिला न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी सुनावणीदरम्यान म्हटले की, "आपल्या हिंदू समाजाच्या विद्यमान रचनेला कमकुवत करू नका. महिलांचे हक्क महत्त्वाचे आहेत, परंतु सामाजिक रचनेचा आणि महिलांना हक्क देण्यामध्ये संतुलन असले पाहिजे."
न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना म्हणाल्या की, "जेव्हा एखादी महिला लग्न करते, तेव्हा कायद्यानुसार, ती तिच्या पती, सासू-सासरे, मुले आणि तिच्या पतीच्या कुटुंबाची जबाबदारी असते. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, ती इच्छापत्र करू शकते किंवा तिला हवे असल्यास पुनर्विवाह देखील करू शकते." न्यायमूर्तींनी पुढे म्हटले, "जर एखाद्या महिलेला मुले नसतील तर ती नेहमीच इच्छापत्र करू शकते.
एक महिला तिच्या पालकांकडून किंवा भावंडांकडून पोटगी मागू शकत नाही. विवाह विधींमध्ये असे म्हटले आहे की ती एका कुळातून दुसऱ्या कुळात जात आहे. ती तिच्या भावाविरुद्ध पोटगीचा अर्जही दाखल करू शकत नाही.