मागील काही दिवसांपासून दिल्लीत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत.अशातच दिल्लीतील अलीपूर भागात असलेल्या एका कारखान्याला सोमवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण कारखान्याला विळखा घातला. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुळाचे लोळ उठले. त्यामुळे अनेकांचा दम घुसमटला.
दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३४ बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे अलीपूर येथील एका तेल बनवण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण कारखान्याला विळखा घातला. आग इतकी भीषण होती, की परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोळ उठले. आग लागल्याचे कळताच कारखान्यातील कामगारांनी वेळेवर बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
या आगीमुळे उठणाऱ्या धुराचे लोळ परिसरातील घरांमध्ये पसरल्याने अनेकांचा जीव घुसमटला. सध्या अग्निशमन दलाचे ३४ बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या भीषण आगीचा व्हिडीओ समोर आला आहे.