मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली असून त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मागील काही दिवसांपासून लालकृष्ण आडवाणी यांच्या तब्येतीत सातत्याने बिघाड होत आहे. त्यामुळे तपासणीकरीता त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी हे 97 वर्षांचे आहेत. मागील चार ते पाच महिन्यात आडवाणी यांना चौथ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.