राजकीय : कॉंग्रेसचा माजी आमदार भाजपच्या गळाला ; प्रवेशाचा मुहुर्तही ठरला
राजकीय : कॉंग्रेसचा माजी आमदार भाजपच्या गळाला ; प्रवेशाचा मुहुर्तही ठरला
img
Dipali Ghadwaje
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऑपरेशन लोटस पुन्हा सक्रिय करण्यात आलं आहे. त्यामध्ये कॉंग्रेस, शरद पवार गट आणि अजित पवार गटातील लोक देखील सोडली जात नाही आहेत. त्यामध्ये आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक कॉंग्रेसचा माजी आमदार भाजपच्या गळाला लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप लवकरच  भाजपमध्ये जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाची तारिख देखील निश्चित झाली आहे. 16 जुलै रोजी त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश पार पडणार आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

 संजय जगताप  विधानसभा निवडणुकीपासून कॉंग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यांचा भाजप प्रवेश संग्राम थोपटेंसोबत होणार होता पण त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला होता. तर जागताप कुटुंबाचं कॉंग्रेमध्ये मजबूत स्थान आहे.

त्यामुळे जगतापांच्या भाजप प्रवेशाने कॉंग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. तसेच यामागे भाजपला पुरंदरसह बारामती लोकसभा मतदासंघात आपली ताकद वाढण्याची संधी आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group