ठाकरे गटाला धक्का ! माजी आमदार भाजपच्या वाटेवर
ठाकरे गटाला धक्का ! माजी आमदार भाजपच्या वाटेवर
img
वैष्णवी सांगळे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. दरम्यान सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपक साळुंखे शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा होती. 


आज या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. माजी आमदार दीपक साळुंखे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात काल दुपारी बैठक झाली. सांगोल्यात ही बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. दरम्यान, काल त्यांनी भाजप पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या जवळ असताना साळुंखे यांच्या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे नेते आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर साळुंखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group