दैनिक भ्रमर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेंच्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधुंना दारूण पराभव सहन करावा लागला आहे. या निवडणुकीत एकूण २१ जागांसाठी मतदान झाले होते, ज्यापैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंच्या पॅनेलला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेआधी ठाकरे बंधुंना हा मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवानंतर आता भाजपने हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्यांकडून एक्स या समाज माध्यमांवर टीका करण्यात येत आहे.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधुंवर निशाणा साधत म्हटलं की, "एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां'ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते. हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी'च्या निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे!!
< >
div