'आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला', परप्रांतीय महिलेची डी मार्टमध्ये मुजोरी
'आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला', परप्रांतीय महिलेची डी मार्टमध्ये मुजोरी
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटल्याची चिन्ह आहेत. कल्याणमध्ये डी मार्टमधील एका अमराठी महिलेची मुजोरी पहायला मिळाली.  'माझ्याशी मराठीत नाही, हिंदीत बोला' असे म्हणत अमराठी महिलेने दादागिरी केली. डी मार्टमधील अमराठी महिलेचं त्या कृत्यमुळे कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली असून या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. 


काउंटरवर खरेदीसाठी आलेल्या महिलेने कर्मचार्‍यांना “माझ्याशी मराठीत नाही, हिंदीत बोला” अशी मागणी केली. मात्र कर्मचाऱ्यांनी “मला मराठी येते, मी हिंदीत बोलणार नाही” असे ठाम उत्तर दिल्यावर त्या महिलेने गोंधळ घातला. महिलेने तुम्ही मराठी लोक कचरा आहात, आमच्या जीवावर जगता, आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला आहे, असे बोलत वातावरण तापवले. मात्र या वेळी त्या ठिकाणी असणार्‍या इतर मराठी ग्राहकांनी या महिलेचा विरोध करत ही माहिती मनसे कार्यकर्त्यांना दिली.

मनसे कार्यकर्त्यांना घटनास्थळी धाव घेत महिलेला धडा शिकवला. मनसे कार्यकर्त्यांनी डी मार्टच्या बाहेर त्या महिलेचा, तिच्या मुलाचा आणि सोबत असलेल्या लोकांचा जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या या भूमिकेनंतर डी मार्ट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते. अखेर मनसे कार्यकर्त्यांनी त्या महिलेला माफी मागितल्यानंतरच बाहेर जाण्यास सांगितले. 

यानंतर त्या महिलेने सर्वांसमोर हात जोडून 'मी मराठी आहे, मी मराठीत बोलते' असे सांगत मनसे कार्यकर्त्यांची माफी मागितली. सध्या खडकपाडा पोलिसांत याविषयी तक्रार दाखल करण्यात आलेय.या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
MNS |
इतर बातम्या
Join Whatsapp Group