विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारचं मोठं गिफ्ट ; मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी
विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारचं मोठं गिफ्ट ; मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी
img
Dipali Ghadwaje
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध सुरु झाले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईत येणाऱ्या पाचही टोलनाक्यांवरून ये-जा करणाऱ्या हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. याचा फायदा मुंबईत नागरिकांसोबतच मुंबई बाहेरून मुंबईत येणाऱ्या वाहनांना होणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे. या टोलमाफीतून अटल सेतू, वरळी सीलिंक वगळण्यात आला आहे. दरम्यान या राज्य सरकारच्या या निर्णयाचा छोट्या कार चालकांना मोठा फायदा होणार आहे.

  •  कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी? 

    • आनंदनगर टोलनाका
    • दहिसर टोलनाका
    • मॉडेला टोलनाका
    • वाशी टोलनाका
    • ऐरोली टोलनाका
इतर बातम्या
Join Whatsapp Group