क्रिएटिव्हिटी की क्रूरता ! संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणारे 'एबिसु कॉकटेल' आहे तरी काय ? का होतेय टीका ?
क्रिएटिव्हिटी की क्रूरता ! संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणारे 'एबिसु कॉकटेल' आहे तरी काय ? का होतेय टीका ?
img
वैष्णवी सांगळे
अभिनेता संजय दत्त सध्या एका अडचणीत सापडला आहे. संजय दत्तच्या मुंबईतील रेस्टो-बारमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून हे रेस्टॉरन्ट वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. संजय दत्त आणि उद्योजक अभिमन्यू जाखड यांच्या मालकीच्या मुंबईतील 'अल्टा स्टेला' या रेस्टॉरन्टमधील संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून प्राणीप्रेमींनी या रेस्टॉरंटला चांगलंच धारेवर धरलं आहे.



काही दिवसांपूर्वीच संजय दत्तने त्याच्या मित्रासोबत 'अल्ता स्टेला' नावाचं रेस्टॉरंट-बार सुरू केलं होतं. मात्र या रेस्टॉरंटमधील एका कॉकटेलमुळे खळबळ उडाली आहे. जिवंत मासा असलेलं कॉकटेल या रेस्टॉरंटमध्ये दिलं जातं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे 'एबिसु कॉकटेल' ? 
हे एक अत्यंत वेगळ्या प्रकारचे कॉकटेल आहे, जे त्याच्या प्रेझेंटशनमुळे चर्चेत आले. जिवंत मासा या कॉकटेलच्या ग्लासमध्ये ठेवला जातो. ड्रिंक सर्व्ह करताना त्याच्या वरच्या बाजूला आग लावली जाते.

 'अल्ता स्टेला' रेस्टॉरंटच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आलेल्या कॉकटेलच्या व्हिडीओमध्येही हे ड्रिंक दिसलं होतं. पण एका इन्फ्लुएन्सरच्या व्हिडीओत हे जिवंत मासा असलेलं कॉकटेल दिसल्याने संताप व्यक्त होतो आहे. अनेकांनी कमेंट करत यावर आक्षेप घेतला आहे. याशिवाय 'अल्ता स्टेला' रेस्टॉरंटमध्ये डेकोरेशनसाठीही टेबलावर जिवंत मासे ठेवण्यात येत असल्याचं काहींनी म्हटलं आहे. यानंतर संजय दत्तच्या रेस्टॉरंट मेन्यूमधून 'एबिसु कॉकटेल' हे ड्रिंक काढून टाकण्यात आलं आहे. 

रेस्टॉरंटच्या सोशल मीडियावरुन एक पोस्टही शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की "आम्हाला तुमची काळजी कळते, आमच्याकडून नेहमीच प्राण्यांच्याबाबत पूर्ण काळजी घेतली जाते. 'एबिसु कॉकटेल' हे मीन राशीपासून प्रेरित ड्रिंक होतं. बेटा फिश हे फायटर फिश म्हणूनही ओळखलं जातं. बेटा फिश हे तळातूनही श्वास घेऊ शकतात. म्हणूनच त्यांना एकटं ठेवलं जातं. पण कॉकटेलमध्ये जिवंत माशाबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळेच आम्ही हे ड्रिंक यापुढे सर्व्ह न करण्याचा निर्णय घेतला आहे". 
इतर बातम्या
Join Whatsapp Group