रोहित आर्याच्या एन्काऊंटरबाबत धक्कादायक खुलासा
रोहित आर्याच्या एन्काऊंटरबाबत धक्कादायक खुलासा
img
वैष्णवी सांगळे
मुंबई : ऑडिशनला आलेल्या २० जणांना ओलीस ठेवणारा रोहित आर्या पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. खरच रोहितला गोळी मारणे आवश्यक होते का ? त्याला दीपक केसरकरांसोबत का बोलू दिले नये ? रोहितला कार्याला गोळी मार्ट असताना पोलिसांनी मुलांच्याही जीवाला धोखा निर्माण केला असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. 



ऑडिशनला आलेल्या मुलांना ओलीस ठेवल्यानंतर रोहित आर्यानं एक व्हिडिओ रिलीज इमारतीला आग लावण्याची धमकी दिली होती. मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काऊंटर केला. आता या एन्काऊंटर प्रकरणी अनेक वेगवेगळे खुलासे होत आहेत. 



पवईतील आरए स्टुडिओमधील ओलीस प्रकरणात एन्काऊंटर प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार आहे. रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणाबाबत पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीतून नवा खुलासा झालाय. पोलिस फिर्यादीत आर्याने पोलिसांवर गोळी झाडल्याचा कोणताही उल्लेख नाहीये. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची आवश्यकता होती? तसेच आर्याच्या कटामागे इतर कोणी सहभागी होते का? याचीही चौकशी केली जात आहे.

घटनेत सहभागी सहायक निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आर्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान वाघमारे यांच्या गोळीबारातच आर्याचा मृत्यू झाला होता. आर्याने पोलिसांवर गोळी झाडल्याचा उल्लेख नाहीये. 

पोलिसांनी नमूद केल्याप्रमाणे ओलीस मुलांच्या सुटकेसाठी बाथरुमच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आर्याने बंदूक रोखल्याने मुलांची सुरक्षा आणि स्वसंरक्षणाच्या उद्देशाने गोळी झाडण्यात आली, असा दावा पोलिसांनी केलाय. अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे आणि उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा हा तपास केला जाणार आहे.
mumbai |
इतर बातम्या
Join Whatsapp Group