थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार...  मुंबई एअरपोर्टवर धमकीचे कॉल्स
थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार... मुंबई एअरपोर्टवर धमकीचे कॉल्स
img
वैष्णवी सांगळे
शुक्रवारी मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 'टर्मिनल 2' वर बॉम्बची धमकी देणारा फोन आला. ही बातमी मिळताच, तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आणि त्यांनी विमानतळाची झडती घेतली. तथापि, सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या सखोल तपासणीदरम्यान विमानतळावर काहीही संशयास्पद आढळले नाही.

शुक्रवारी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला तीन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन आले, ज्यामुळे खळबळ उडाली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असल्याचा दावा कॉल करणाऱ्याने केल्याने एकच धावपळ उडाली. 

पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे उच्च अधिकारी आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले. एअरपोर्टचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक कोपऱ्याची, सखोल, बारकाईने तपासणी करण्यात आली. 

ऐकावं ते नवलंच ! चिमुकल्याने नागाचा घेतला चावा, नागाचा मृत्यू

मात्र पोलिस व बॉम्बशोधक पथकाला कुठेच, काहीही संशयास्पद सापडलं नाही. त्यामुळे बॉम्बची ही केवळ अफवा असल्याचं दिसून आलं.पोलिस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचे हेतू शोधता येतीलल यासाठी तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group