गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. अशातच आता आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट पतपेढीची ही निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या मनसे कर्मचारी सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
हे ही वाचा !
बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेची युती झाली असून प्रणित उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत निवडणूक एकत्र निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा जोर धरत असतानाच आता महापालिका निवडणुकांपूर्वीच शिवसेना-मनसेची युती झाल्याचं पाहायला मिळत आहे.