मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या संतोष धुरी आज भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तर संतोष धुरी यांच्यानंतर मनसे प्रवक्ते हेमंत कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हेमंत कांबळे यांच्यासहित इतर बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस राजा चौगुले, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे अॅड.देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर, संतोष यादव यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
मनसे नेत्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.