जिल्हाध्यक्षाच्या भावाला मारहाण प्रकरणावरून मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल
जिल्हाध्यक्षाच्या भावाला मारहाण प्रकरणावरून मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर
मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचा भाऊ अतीश मोरे यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. समीर मोरे यांच्या भावावर काही गुंडांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे . मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून हल्ला करण्यात आल्याचा मोरे कुटुंबीयांचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणी आता मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर अखेर 24 तासानंतर पालघरच्या सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे बंधू अतिश मोरे यांना मारहाण केल्या प्रकरणात अविनाश जाधव यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर मधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना पालघर विधानसभा मतदारसंघाचील पराभवाची कारण सांगितली . यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना  केली. पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली आणि हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते. 

दरम्यान, अखेर कुटुंबाच्या आरोपानंतर कलम 118 (1) , 189 (2 ), 189 (4) 191 (2) , 191 ( 3) प्रमाणे सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली.  सातपाटी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group