भेटीगाठी वाढल्या ! मनसे-शिवसेना युतीचं ठरलं, घोषणा कधी ?
भेटीगाठी वाढल्या ! मनसे-शिवसेना युतीचं ठरलं, घोषणा कधी ?
img
वैष्णवी सांगळे
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहे. मनसे-शिवसेना युतीच्या चर्चेनेही जोर धरला आहे. आता या युतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या राजकीय युतीचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही पक्षांच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चेला सुरूवात झाली असल्याची माहिती आहे.


हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला होता. दोन्ही नेत्यांनी मराठी अस्मितेसाठी मोर्चेचं अस्त्रही हाती घेतलं होतं. मात्र, त्यानंतर शासनाने हिंदी भाषा सक्तीसंदर्भातील जीआर रद्द केला. याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येत विजयोत्सव साजरा केला होता. यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या. मात्र, अद्याप तरी दोन्ही नेत्यांनी युती झाली असल्याचे अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा दिवाळीनंतर, आयोग 'या' दिवशी जाहीर करणार निवडणूक ?

निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा होताच, शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय युतीची घोषणा होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तोपर्यंत दोन्ही पक्षातील पहिल्या फळीतील नेत्यांकडून जागावाटपावर भर देण्यात येत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांत एकमत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटप ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल परब, सुरज चव्हाण आणि वरूण सरदेसाई या नेत्यांवर जागावाटपाबाबत चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, ठाण्यात राजन विचारे, केदार दिघे यांच्यासह काही नेत्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे यांच्याकडेही जागा वाटपाबाबत चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची जबाबदारी आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group