"त्या" आरोपावरून संजय राऊत यांची नीलम गोऱ्हे यांच्यावर जहरी टीका; म्हणाले नीलम गोऱ्हे म्हणजे...
img
दैनिक भ्रमर
शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काल उद्धव ठाकरेंवर एक खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालेला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काल मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात केला होता. या विधानावरुन आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला.

नीलम गोऱ्हे यांचं विधान म्हणजे त्यांची विकृती. नमक हराम बाई अशा शब्दांत संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली. नीलम गोऱ्हे बाई नसून बाईमाणून आहे, भ्रष्ट आहे असेही ते म्हणाले. 
काल नीलम गोऱ्हे म्हणाल्या 50 लाख रुपये दिले महामंडळाला... लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात?माझ्याकडे माहिती आहे पुरावे आहेत, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला. 

नीलम गोऱ्हेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्याकडे लक्ष देत नाही.एक महिला म्हणून आदर आहे. त्यांनी राजकारणात त्यांचं चांगभलं केलं आहे. गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही. त्यांनी आख्खी शिवसेना संपवली असे त्यांना वाटत असेल. पण माझी जुनी माणसे, निष्ठावान माणसे माझ्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असंही विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group