शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून बिघाड झाला आहे. मुंबईतील भांडूपमधील फोर्टिस रूग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पुढील दोन महिने राऊत हे सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहेत. संजय राऊत यांनी रुग्णालयातून ट्वीटरवरुन एक फोटो शेअर केला आहे.
संजय राऊत यांनी हे ट्वीट करत त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता! असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
या फोटोत संजय राऊत हे रुग्णालयातील बेडवर रुग्णाचे कपडे घालून बसल्याची झलक दिसत आहे. यावेळी त्यांच्या हातावर सलाईन लावल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ते एक पेपर आणि पेन हातात धरुन लिहित असल्याचे दिसत आहेत. या पेपरवर एडिट असे लिहिलेल असल्याने अनेकजण ते सामनाचा अग्रलेख लिहित असावे असा अंदाज बांधत आहेत.