...तर आम्ही कोल्हापुरात नाराजी दाखवू : संजय राऊत
...तर आम्ही कोल्हापुरात नाराजी दाखवू : संजय राऊत
img
दैनिक भ्रमर
महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेबाबत निर्णय झाला आहे. ती जागा शिवसेनाच (ठाकरे) लढणार आहे. त्यामुळे तेथे काँग्रेस नेते विशाल पाटील वेगळा निर्णय घेणार नाहीत. 2019 मध्ये केलेली चूक ते पुन्हा करणार नाहीत, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. उमेदवार आणि जागावाटप पूर्ण झालेले आहे. त्यामुळे जागावाटपात कोणताही बदल होणार नाही. सांगलीत कोणीही नाराजी दाखवली, तर शिवसेनेचे लोक कोल्हापुरातही नाराजी दाखवू शकतील, असा इशाराही राऊत यांनी काँग्रेसला दिला.

जागावाटपानंतर सांगलीचे नेते ‘नॉट रिचेबल’ असून, जागेसंदर्भात बदल अपेक्षित आहे का, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता राऊत म्हणाले, जागावाटप आणि उमेदवार जाहीर झालेले आहेत. त्यात आता कोणताही बदल होणार नाही; पण आम्ही काँग्रेस नेत्यांची समजूत काढू. नाराजी म्हणाल तर आमचे लोकही दाखवू शकतात. अमरावती, कोल्हापूर, रामटेक येथे आमच्याही कार्यकर्त्यांनी नाराजी दाखवली; पण आम्ही त्यांची समजूत काढली. आता सर्वांनी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. त्यामुळे जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्या, तरी सर्वांना काम करावे लागणार आहे, असेही राऊत म्हणाले.

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र 'या' क्रमांकावर

जागावाटपात सांगलीत काँग्रेस नेते कमालीचे नाराज आहेत. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. जनतेची सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. आमदार, खासदार पक्षाला सोडून गेले असले, तरी कार्यकर्ते आमच्यासोबतच आहेत. परंतु, गेल्यावेळी आमचे 18 खासदार निवडून आले होते, तर राज्यात काँग्रेसचा केवळ एकच खासदार जिंकून आला होता. त्यामुळे ज्या-ज्या भागात आमची ताकद होती, तेथील जागा आम्ही घेतल्या. 

जबरदस्तीने घेतलेल्या नाहीत, असे राऊत म्हणाले. भाजपबरोबर युतीत असतानाही शेवटपर्यंत एखाद-दुसर्‍या जागेवरून मतभेद होत होते. त्यामुळे अशाप्रकारे अडचणी येणार, हे गृहीत धरले होते. त्यात सांगली आणि भिवंडीचा तिढा निर्माण झाला. सांगलीत परंपरेने काँग्रेसचे लोक निवडून आलेले आहेत. शिवसेनेची निवडणूक लढण्याची ताकद कमी असली, तरी मतदार ‘मशाली’ला मतदान करतील, असा आमचा विश्वास आहे. तेथे 2014 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. 2019 मध्ये काँग्रेस तेथे लढलीच नव्हती, तर त्यांनी ती दुसर्‍या पक्षाला जागा सोडली होती, असेही राऊत म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group