आज राज्यात नवं सरकार स्थापन होणार असून राज्याला नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीची मंगळवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय सांगतो असे म्हणले होते. यावरून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याबाबत संभ्रम आहे. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, दिल्लीसोबत पंगा घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही.', असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना सांगितले की, 'एकनाथ शिंदे १०० टक्के उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दिल्लीसोबत पंगा घेण्याची हिंमत त्यांच्यात अजिबात नाही. आज तिघे शपथ घेतील. बाकीच्या शपथविधीला अनेक वेळ जाईल.'