संजय गायकवाडांच्या राड्यावर उद्धव ठाकरेंच विधिमंडळात मोठं विधान ; नेमकं काय म्हणाले?
संजय गायकवाडांच्या राड्यावर उद्धव ठाकरेंच विधिमंडळात मोठं विधान ; नेमकं काय म्हणाले?
img
Dipali Ghadwaje
आज सकाळपासूनच चर्चा आहे ती आमदार संजय गायकवाडांच्या राड्याची, स्वत:ला शिळ अन्न मिळाल्यामुळे संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केली. सध्या या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

दरम्यान या घटनेचे पडसाद आज विधिमंडळातही उमटले. उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले असताना त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना संजय गायकवाड यांच्या कृत्याबद्दल विचारण्यात आले. 

'हे तर फडणवीसांना बदनाम...'

उद्धव ठाकरे संजय गायकवाड हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामीसाठी काढले गेले असावे असा, वक्तव्य करत संशय व्यक्त केला आहे. सरकारमध्ये काहीतरी चाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसंच ते म्हणाले की, गायकवाडांवर कारवाई करण्याचे आदेश सीएम यांनी दिले  असल्याच माझ्या कानावर आलं आहे. पण ही कारवाई होते की नाही ते काही दिवसांमध्ये कळेलच. 

संजय गायकवाड सारखा आमदार शिवसेनेचा असूनच शकत नाही. तो एसंशि गटाचा आमदार आहे असं सांगत ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे ते वाटच पाहत आहेत, असा संशय उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group