मंत्री भरत गोगावले यांनी केली अघोरी पूजा? नवीन व्हिडिओ चर्चेत , नेमकं काय प्रकरण? वाचा
मंत्री भरत गोगावले यांनी केली अघोरी पूजा? नवीन व्हिडिओ चर्चेत , नेमकं काय प्रकरण? वाचा
img
DB
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन विषय ट्रेंडिंगला आहे. तो म्हणजे भरत गोगावले अन् अघोरी पूजा. यावर गोगावलेंनी  स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. त्यांनी म्हटलं की पूजा ही अघोरी असूच शकत नाही. परंतु या स्पष्टीकरणाला 48 तास उलटले नाही, तर भरत गोगावलेंचा पुन्हा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय.

यामध्ये ते एका मांत्रिकासोबत पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट केला आहे.
 
तीन चार दिवसांपू्र्वी मंत्री भरत गोगावले यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये भरत गोगावले पूजा करताना दिसत होते. त्या व्हिडिओवर ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी म्हटलं होतं की, नेहमी दिसणाऱ्या पूजेपेक्षा ही पूजा वेगळी आहे. परंतु गोगावले यांनी म्हटलं की, पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला असून पूजा अघोरी असूच शकत नाही. परंतु आता त्यांचा पूजेचा नवा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.



व्हिडिओमध्ये काय?

या व्हिडिओमध्ये भरत गोगावले एका सोफ्यावर बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला भगवे कपडे परिधान केलेले काही मांत्रिक असून काळे कपडे परिधान केलेला अजून एक मांत्रिक आहे. तो गोगावलेंच्या हातात एक वस्तू त्यांच्या कपाळावर लावून देत आहे. नेहमी होणार्‍या पूजेपेक्षा ही पूजा वेगळी दिसत आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group