राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चाबांधणी सुरू केली असून, अशातच शिवसेना ठाकरे गट यांच्या बालेकिल्ल्यालाही मोठा धक्का बसताना दिसत आहे.
मालवणमध्ये ठाकरे गटाला शिंदे गटाने धक्का दिला असून, मसुरे विभागप्रमुख आणि उपसरपंच राजेश गावकर यांनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलं आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद आणखी वाढल्याचं बोललं जात आहे.
मसुरे विभागप्रमुख तथा उपसरपंच राजेश गावकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश केला आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला असून, यावेळी काही बडे नेते देखील उपस्थितीत होते.