पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
img
दैनिक भ्रमर



राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण गाजत आहे. त्यांच्या अमोडिया कंपनीने पुण्यातील कोरगाव पार्कमध्ये केलेल्या एका जमिनीचा व्यवहार वादात सापडला आहे.

बाजार भावानुसार 1800 कोटी रुपये मूल्य असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयात दिली, असा आरोप झाला. त्यात मुद्रांक शुल्कापोटी काही कोटी रुपये भरणं अपेक्षित असताना फक्त 500 रुपये भरली गेली असा आरोप झाला. या जमीन व्यवहाराने अजित पवार यांच्या राजकीय अडचणी वाढवून ठेवल्या. अखेर काल हा जमीन व्यवहार रद्द करत असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं.

यावरुन राज्याच्या राजकारणात विविध मत व्यक्त होत असताना शरद पवार यांनी स्पष्टपणे या मुद्यावर आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले कि या जमीन व्यवहार प्रकरणात चौकशी करुन वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे. पार्थ पवार प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे सौम्य भूमिका घेतली होती. त्यावर हे सुप्रिया सुळेंच व्यक्तिगत मत असू शकतं, असं शरद पवार म्हणाले.

यावेळी शरद पवारांना पत्रकारांनी, अमोडिया कंपनीत 1 टक्के भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो, पण 99 टक्के शेअर असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा नाही, असं का? हा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी याचं उत्तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतील असं शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group