स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून स्थानिक राजकारण चांगलंच तापलंय. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवत आहे. त्याच्यासाठी युद्धपातळीवर इतर पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात ओढून आणत आहेत. एकीकडे शिंदे गटाची ताकत संपलीय, अशी टीका ठाकरे गटाचे नेते करत असताना दुसरीकडे मात्र शिंदे गटात मोठी इनकमिंग होतेय.
जालन्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. सकाळी हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यानं शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. जालना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना ठाकरे गटातून काढल्यानंतर शिंदेंनी लागलीच डाव टाकत भास्कर आंबेकर यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतलाय.
मागील 39 वर्षापासून ठाकरेंच्या पाठीशी असणाऱ्या भास्कर आंबेकरांनी आज शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. आज जालना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर हजारो समर्थकासह शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.