आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आज समोरासमोर येणार ;
आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आज समोरासमोर येणार ; "हे" आहे कारण
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होणार आहे. ही बैठक वरळीत आयोजित करण्यात आली आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची आधी चर्चा होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्री म्हणून उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने समोरासमोर येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. पण आता त्यानंतर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

आदित्य ठाकरे हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. एकनाथ शिंदे यांची पालकमंत्री म्हणून ही पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे.

या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित राहतील अशी शक्यता होती. पण आता ते उपस्थित राहतील याची शक्यता कमी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमदार सुनील शिंदे आणि आमदार सचिन अहिर हे या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांची भेट आज टळणार असल्याची चर्चा आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group