नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार;
नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार; "या" माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :-  नाशिकमध्ये उबाठाला खिंडार पडली असून काही माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

हा  प्रवेश सोहळा प्रातिनिधिक स्वरुपात असून लवकरच नाशिकमध्ये मोठा मेळावा घेऊन मोठा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अनेक वाहनांद्वारे उबाठा गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक हे आपल्या सहकार्‍यांसमवेत असंख्य वाहनांद्वारे मुंबई येथे उपस्थित होते.

हे सर्व पदाधिकार्‍यांनी केवळ पक्षात दुजाभाव दिला जात आहे, नेत्यांकडून विचारणा होत नाही, पदाधिकारी असूनही बर्‍याच गोष्टी परस्पर ठरविल्या जातात आदी कारणांमुळे नाराज होऊन शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी शिक्षणमंत्री दादा भुसे, उपनेते अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश :
सीमा निगळ, किरण गामणे, पुंजाराम गामणे, पुंडलिक अरिंगळे, गोकूळ निगळ, अभिषेक निगळ, स्वप्निल गामणे.

इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group