मोठी बातमी! खाते वाटपाचा तिढा सुटला? शिवसेनेला मिळणार 'ही' दोन महत्वाची खाती
मोठी बातमी! खाते वाटपाचा तिढा सुटला? शिवसेनेला मिळणार 'ही' दोन महत्वाची खाती
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणूक निकालात सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, सत्ता वाटपाच्या तिढ्यावरून जवळपास 13 दिवसांनी सत्ता स्थापन करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने गृह खात्याची मागणी केली होती. मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याने गृह विभागासारखं महत्त्वाचं खातं देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली.

मात्र, भाजपने नकार दिला. आता, यावर तोडगा निघाला आहे.  खाते वाटपाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री खलबतं झाली. या चर्चांमध्ये खाते वाटप आणि मंत्र्यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती  आहे.

भाजप आपल्याकडील दोन महत्त्वाची खाती शिवसेनेला देणार आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारातील मोठी अडचण दूर झाली असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेला कोणतं खातं मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेला महसूल खाते मिळणार आहे. मित्र पक्षाचा मान ठेवण्यासाठी आणि मंत्रिमंडळात सत्तेचा समतोल ठेवण्यासाठी भाजप आपल्याकडील दोन महत्त्वाची खाती देणार आहे. शिवसेनेला महसूल खाते आणि आणखी एक महत्वाचे खाते दिले जाणार असल्याची माहिती आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group