नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेचे धक्कातंत्र सुरूच आहे. नुकताच माजी नगरसेवक मधुकर जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेनेत अजूनही इन्कमिंग सुरूच आहे.
शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक महानगरातील शरणपूर, कॉलेजरोड परिसरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय उत्तमराव कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगर परिसरातील माजी नगरसेविका सुषमा रवी पगारे यांनी कार्यकर्त्यांसह मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी खा. नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय करंजकर, उपनेते अजय बोरस्ते,सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, शिवसेना महानगरप्रमुख प्रविण तिदमे, योगेश मस्के , संजय तुंगार आणि मान्यवर उपस्थित होते.