नाशिकमधील माजी नगरसेविकेसह
नाशिकमधील माजी नगरसेविकेसह "या" पदाधिकाऱ्याची भाजपमधून हकालपट्टी
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी माजी नगरसेविका अलका अहिरे व भाजपचे माजी पदाधिकारी कैलास अहिरे यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.

ए. बी. फॉर्म वाटपाच्या प्रक्रियेदरम्यान संबंधितांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालून पक्षशिस्तीचा भंग केला तसेच ए. बी. फॉर्म पळविल्याचा गंभीर प्रकार घडवून आणला. भाजपने स्पष्ट सूचना देऊनही अधिकृत भाजप उमेदवार पुष्पावती पवार यांच्याकरिता जाहीर माघार घेण्यास व त्यांना जाहीर पाठिंबा देण्यास अलका अहिरे व कैलास अहिरे यांनी नकार दिला. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनात्मक शिस्तीला तडा गेला आहे.

या सर्व गंभीर बाबींची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने शिस्तभंगाची कारवाई करत अलका अहिरे व कैलास अहिरे यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group