उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची वाट केली मोकळी ; 'या' मतदारसंघातून उमेदवार घेतला मागे
उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची वाट केली मोकळी ; 'या' मतदारसंघातून उमेदवार घेतला मागे
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस म्हणजेच 29 ऑक्टोबर शेवटची तारीख असतानाही अनेक मतदारसंघांमधील जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असल्याने अनेक इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. असं असतानाच जागावाटपावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद उघडपणे समोर आले आहेत.

एकीकडे हे मतदभेद आणि दुसरीकडे काँग्रेसवर ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार याद्या जाहीर करताना एका उमेदवार संघात एकमेकांविरोधात उमेदवार दिल्याचं स्पष्ट झालं. याचसंदर्भात संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

एकाच मतदारसंघात दोन उमेदवार

महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच उमेदवारी यादीमध्येही या वादाचे प्रतिबिंब पाहायला मिळालं. काँग्रेसने शनिवारी सकाळी दुसरी यादी जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी रात्री उशीरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार आधीच जाहीर केला आहे तिथे काँग्रेसनेही तिसऱ्या यादीत उमेदवार जाहीर केला. काँग्रेसने शनिवारी रात्री 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाच्या तिन्ही याद्यांमध्ये एकूण 87 उमेदवारांची नावं घोषित झाली. काँग्रेसने तिसऱ्या यादीत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये दिग्रस मतदारसंघांतून माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र या मतदारसंघातून आधीच ठाकरेंच्या पक्षाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण या उमेदवारीसंदर्भात संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना मोठी घोषणा केली.
 
ठाकरेंनी इथून मागे घेतला उमेदवार

पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी, "शिवसेनेनं उमेदवार दिलेला असताना काँग्रेसच्या यादीत त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. मी असं मानतो की ही टायपींग मिस्टेक आहे. पण अशा टायपींग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात. दिग्रजसंदर्भात आमची आणि काँग्रेसची चर्चा झालेली आहे. दिग्रजमध्ये आमचा उमेदवार लढणार नाही. माणिकराव ठाकरेंसाठी ती जागा आम्ही सोडलेली आहे," असं सांगितलं. म्हणजेच ठाकरेंचे उमेदवार पवन जयस्वाल दिग्रसमधून लढणार नाहीत. 

"काल त्यासंदर्भात बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीथेलेलांबरोबर चर्चा झाली. दिग्रजच्या मोबदल्यात आम्हाला दर्यापूर हा मतदारसंघ दिलेला आहे. 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group