ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्याने दिली सोडचिठ्ठी, पदाधिकाऱ्यांसह शिंदेसेनेत केला प्रवेश
ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्याने दिली सोडचिठ्ठी, पदाधिकाऱ्यांसह शिंदेसेनेत केला प्रवेश
img
वैष्णवी सांगळे
महापालिका निवडकांच्या पार्शवभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहे. शिवसेना ठाकरे गटासोबतच काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.  ठाकरे गटाचे परिवहन समितीचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक विजय काटकर यांनी कुटुंब आणि शेकडो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझीनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. 



ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेत ठाकरे गट आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सुरू केला आहे.कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक विजय काटकर आणि त्यांचे कुटुंब हे काही इच्छुक उमेदवार आणि शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा कल्याण मोहने परिसरातील शिवसेनेचे उमेदवार मयूर पाटील यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. 

काटकर यांच्यासोबत काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझी तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. विजय काटकर हे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख, केडीएमसी परिवहन समितीचे माजी सभापतीआणि माजी नगरसेवक होते. अनेक वर्षे निष्ठेने काम करूनही तिकीट वाटपात अन्याय झाल्याचा आरोप करत पक्षप्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

इथे निष्ठेला किंमत नाही, फक्त पैशाला किंमत आहे, असा थेट आरोप काटकर यांनी ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांच्यावर केला. दुसरीकडे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सलीम काझी यांनी काँग्रेसमधील हुकूमशाही कारभार आणि सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली. विकासकामांसाठी पुढाकार घेऊनही सन्मान मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group