दैनिक भ्रमर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना - मनसेची युती होत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत. त्यातच आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहे. अशातच त्यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठं विधान केले. 'आम्ही दोघे भाऊ समर्थ आहोत. आम्हाला जे काही करायचे आहे ते आम्ही करू. त्यामध्ये तिसऱ्याची काहीच गरज नाही.' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचसोबत, इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्थी नाहीत, असं देखील त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा !
तसचं, 'सरकारला नितीमत्ता राहिली नाही. आताचे सत्ताधार फक्त मतलबी आहेत. देशाचे सरकार चालवतंय कोण? देशाला पंतप्रधानांची गरज आहे. मोदी, शहा हे देशाचे नाहीत तर भाजपचे प्रचारमंत्री आहेत. देशाला मजबूत पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज आहे. जेव्हा देशावर संकट येते तेव्हा ते गायब होतात.', अशा शब्दात त्यांनी मोदींना टोला लगावला.