शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणीसाठी आता नवीन तारीख मिळाली आहे. या दोन्ही पक्षांच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालय पुढच्या वर्षी म्हणजे, 21 जानेवारी रोजी सुनावणी करणार आहे. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास पार पडल्यानंतर याचा फैसला होण्याची शक्यता आहे.
कोर्टात काय घटलं?
आज दुपारी सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीच्या सुरुवातील शरद पवारांचे वकील कपिल सिब्बल यांनी मला सुनावणीसाठी 2 तास लागतील अशी माहिती दिली. यावर कोर्टाने तुम्ही सुरुवातीला कोणत्या प्रकरणाचा युक्तिवाद करणार आहेत अशी विचारणा केली. त्यानंतर वकिलांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठड्यात सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानंतर आता 21 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज शिवसेना आणि राष्ट्रवादी संबंधी सुनावणी पार पडली. त्यानंतर आता 21 जानेवारी ही पुढची तारीख देण्यात आली आहे. त्या दिवशी पहिल्यांदा शिवसेना प्रकरणात युक्तिवाद होणार आहे. शिवसेनेच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रकरणही ऐकले जाईल. त्यासाठीही दोन्ही गटांना दोन तासांचा वेळ देण्यात येणार आहे. ही सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधी निकाली लागणार का, याविषयी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. पण आता पुढच्या तारखेमुळे त्याची शक्यता मावळण्याची चिन्हे आहेत.