जेष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल ; तब्येतीविषयी डॉक्टर काय म्हणाले ?
जेष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल ; तब्येतीविषयी डॉक्टर काय म्हणाले ?
img
वैष्णवी सांगळे
मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे, त्यांना उपचारासाठी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचं बोललं जात होतं, मात्र आज अचानक त्रास वाढल्यामुळे त्यांना बारामतीमधून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाणार आहे. डॉक्टर परवेझ ग्रँट तपासणीनंतर शरद पवारांना एडमिट करायचे की उपचार करून घरी पाठवायचे याबाबतचा पुढील निर्णय घेतील. शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासमवेत रुबी हॉस्पिटलमध्ये आहेत. 

दरम्यान, आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ.", असे डॉक्टरांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group