राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच शरद पवारांना धक्का , बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच शरद पवारांना धक्का , बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
img
DB
एकीकडे काका-पुतण्या एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच दुसरीकडे मात्र शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाला पक्षाच्या वर्धापनदिनीच साताऱ्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यात वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच एका बड्या नेत्याने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group