रोहिणी खडसेंची पतीला वाचवण्यासाठी धडपड,  'या' मोठ्या नेत्याच्या भेटीला
रोहिणी खडसेंची पतीला वाचवण्यासाठी धडपड, 'या' मोठ्या नेत्याच्या भेटीला
img
वैष्णवी सांगळे
रेव्ह पार्टीमुळे गेल्या काही दिवसांपासून खडसे कुटुंबीय चर्चेत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरला पोलिसांनी पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. धक्कादायक बाब म्हणजे पुरूषांसोबतच काही महिलांचा देखील या रेव्ह पार्टीत सहभाग होता. सध्या रेव्ह पार्टी प्रकरणी सात जण कोठडीत असून त्यांना पुणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा... 
धक्कादायक ! पोलीस दलात खळबळ; घरात घुसून महिला पोलिसालाच...

कोर्टाने खडसेंच्या जावयासह 4 जणांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या पार्टीतून पोलिसांना कोकेन आणि गांजा मिळालाय. पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले की,प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि व्हिडीओ सापडले आहे.

पती प्रांजल खेवलकर हा न्यायालयीन कोठडीत असताना आता रोहिणी खडसे या थेट शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. या भेटीमध्ये काय चर्चा होते, शरद पवार या सर्वांवर काही भाष्य करतात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group