केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावी ते वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले आहेत.
यावेळी त्यांनी संस्थेच्या काजू प्रक्रिया युनिट आणि माती तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा 46 हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकरासाठी काय केलं? मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं आहे, जमिनीवर राहून काम करणे गरजेचं असतं असा हल्लाबोल यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर केला आहे.