तब्ब्ल १७ वर्षानंतर आज 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व कथित आरोपींची आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी पुराव्यांअभावी एनआयएच्या विशेष न्यायालयाने 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यानंतर आता कोणी जल्लोष करत आहेत तर कोणी या निकालावर नाराजी व्यक्त करत आहे. मालेगावमधील या बॉम्बस्फोटातील पिडीतांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या स्फोटात शेख लियाकत मोईउद्दीन यांनी त्यांची मुलगी गमावली होती. माझी मुलगी वडापाव आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. नंतर कळालं तिचा देखील ब्लास्ट मध्ये मृत्यू झाला. आजचा विशेष न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. हेमंत करकरे यांनी अत्यंत सखोल तपास केला. अनेक पुरावे देखील सादर केले. तरी देखील निर्दोष मुक्तता झाली. आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. असे ते म्हटले होते.