मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 100 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. तब्बल 17 वर्षानंतर NIA कोर्टाने निकाल देत सर्वच संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी होत्या. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यावर आता साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, ‘मला जेंव्हा तपासयंत्रांनी बोलावल तेंव्हा मी सहकार्याच्या भावनेने आले होते. पण मला पोलीस कोठडीत ठेवेल अपमान केला मारहाण केली.’ कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञाना रडू कोसळल. पुढे त्या म्हणाल्या, ‘माझा समाजात अपमान झाला. पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले पण मला लोक वाईट नजरेने बघायचे, अपमानित करायचे... माझ्यावरून भगव्या रंगला कलंकित केल गेल. १७ वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले आहे. अपमानच आयुष्य मी १७ वर्षे जगत होते. भगव्याला आतंकवाद बोलल आज भगव्याचा विजय झाला हिंदुत्वाचा विजय झाला.‘