
५ मार्च २०२४
मनमाड (नैवेद्या बिदरी) :- मानवी वस्तीमध्ये बिबट्याचे वास्तव ठिकठिकाणी दिसून येत आहे.
आज मालेगावात नर जातीचा बिबट्या रेस्क्यु करण्यात आले. मालेगावच्या साई सेलिब्रेशन लॉन्स मध्ये बिबट्या आढळल्याने नागरिकांची धावपळ झाली. एका लहानग्याच्या प्रसंगावधानाने बिबट्याला लॉन्स मध्ये कैद करण्यात वन विभाग यशस्वी झाले.
बिबट्या रेस्क्यू करतांना नागरिकांनी गर्दी केल्याने रेस्क्यू करण्यात अडथळे येत होते. ब्लो पाईपद्वारे डॉट देत बिबट्याला दिली भुल देण्यात आली. नाशिक येथील रेसक्यू टीमसह स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांनी पकडला बिबट्याचे यशस्वी रेस्क्यु केले. बिबट्याला पकडल्याचे समजताच वन अधिकारी व ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Copyright ©2025 Bhramar