नाशिकरोड (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसा पूर्वी गंगापूररोड वरील मानवी वस्तीत दर्शन देऊन गेलेला बिबट्या आज सकाळी वन विभागाच्या पिंजाऱ्यात अडकला आहे.
चार दिवसापूर्वी गंगापूररोड जवळील रामेश्वर नगर येथे एका बिबट्याने काही नागरिकांना दर्शन दिले होते व त्या भागात एका श्वानाला आपली शिकार केले होती. त्यामुळे रहिवसी यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वन अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून गोदावरी नदी लगत असलेल्या बेंडकुळे मळा येथे पिंजरा लावला होता. आज सकाळी पिंजऱ्याच्या दिशेने बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येऊ लागला. वन अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता साधारण सहा वर्षाचा नर जातीचा बिबट्या पिंजाऱ्यात अडकल्याचे दिसून आले.
वन अधिकारी अनिल अहिराराव, उत्तम पाटील, खानझोडे यांनी बिबट्याला सुरक्षित रित्या वैद्यकीय उपचाराकरीता गंगापूर येथील रोपवाटिका येथे हलवले. यामुळे नागरिकांमधील भीती दूर झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.